7k Network

त्यांचा काळ आलाच होता एका अपघातातून वाचले दुसऱ्या अपघातात मृत्यू…!

,काळ वेळ कधी कोणाला सांगून येत नाही मृत्यू हे अटळ सत्य आहे.एका अपघाताच्या घटनेने बिड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराईजवळील गढी पुलावर झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. प्रथम एसयूव्हीचा किरकोळ अपघात झाला, पण गाडीतून बाहेर पडल्यानंतर ट्रकने धडक दिली.मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ट्रक चालक फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जवळ गढी पुलावर एक भीषण आणि विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला असून या विचित्र अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बंद पडलेली गाडी आणण्यासाठी गेलेल्या गेवराई शहरातील सहा जणांना भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री उशिरा घडली असून सदरील घटना समजताच गेवराई उपजिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती. या धडकेत बाळु आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सरोया, भागवत परळकर, सचिन नन्नवरे यांचा मृत्यु झाल्याचे समजते. हा अपघात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर गढी कारखान्या समोर उड्डाणपुलावर घडला आहे.‌

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार गेवराई शहराजवळ असणाऱ्या गढी पुलावर एक एसयूव्ही वाहनाचा डीव्हाईडरला धडक बसल्याने किरकोळ अपघात झाला होता. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र गाडी डिव्हायडरवर अडकली होती. ती गाडी बाहेर काढण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असताना महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या ट्रकने सात जणांना जोरात धडक दिली. यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला असल्याची माहिती आता समोर आली आहे.

जखमीवर सध्या उपचार सुरू

याबाबत प्राप्त माहिती नुसार या अपघातामध्ये बाळु आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन नन्नवरे यांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. यातील सहा जण हे गेवराई परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली असून या घटनेमुळे गेवराईवर शोककळा पसरली आहे.

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!