दारव्हा येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात प्रियांशू प्रमोद डाफे (वर्ग १० वी, 74.50%) या विद्यार्थ्याचाही विशेष गौरव करण्यात आला. दारव्हा येथील रहिवासी असलेला प्रियांशू शारीरिकदृष्ट्या अपंग असूनही त्याने परीक्षा देताना writer (लेखक) न घेता स्वतःच स्वतःचा पेपर लिहिला. त्याची ही जिद्द, आत्मविश्वास आणि प्रयत्नशीलता इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. प्रियांशूच्या संघर्षाला आणि कष्टांना मान्यता देत मंचावर त्याचा विशेष सत्कार ना.संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.